पिंपळे निलखमध्ये सव्वा आठ लाखांची घरफोडी

संदीप घिसे
शनिवार, 14 एप्रिल 2018

विशाल गोवर्धन पटेल (वय ३२, रा. द्वारकामाई वंडर सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी पिंपळे निलख येथे उघडकीस आली. 

विशाल गोवर्धन पटेल (वय ३२, रा. द्वारकामाई वंडर सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पटेल यांचे मामा गंगोत बंगला, गोविंद व्हिला, गुलमोहर कॉलनी, विशालनगर, पिंपळे निलख या ठिकाणी राहतात.

जानेवारी महिन्यामध्ये विशाल यांचे मामा आपल्या मुलींकडे अमेरिकेमध्ये गेले आहेत. यामुळे विशाल हे कधीतरी मामांच्या घरी येत-जात असे. ३ ते १३ एप्रिल या दरम्यान विशाल यांच्या मामाचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचा दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील १७ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, असा एकूण आठ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक निरीक्षक अलका सरग याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: decoit in Pimpri chinchwad