पोलिस भरतीसाठी गेली अन् 'आयसीयू'त दाखल झाली

deepali kale
deepali kale

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): पारधी समाजात मुलीला शिकवून देत नाही, पण मला शिकायचय अधिकारी बनायच, आईच्या कष्टाला साथ द्यायची. अशी दोन वर्षापुर्वी बारावीत प्रथम आलेल्या दिपाली काळे ने प्रतिक्रिया दिली होती. अॅकेडमी मधून प्रशिक्षण घेऊन तिने मुंबई येथे पोलिस भरती प्रक्रियेत सामिल झाली होती. तेथून परतत असताना तिला व तिच्या सोबत असणाऱ्या तीन मुलींला मोटारीने उडविल्याने अपघात झाला. यामध्ये दिपाली हिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. नेहमी शिक्षणासाठी दिपाली हिला मदत करणाऱ्यांना या घटनेमुळे अस्वथता निर्माण झाली आहे.

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे पारधी समाजातिल दिपालीने बारावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत 75.69 टक्के गूण मिळवून विद्यालयात दिपाली प्रदीप काळे ही प्रथम आली होती. अतिशय गरीब परीस्थीती तिने हे शिक्षण पुर्ण केले आहे. कुटूंबात कर्ता माणूस नसूनही मोलमजूरी करून तिच्या आईने तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे. वेळप्रसंगी उपाशी तर आईबरोबर शेतमजूरी करून तीने शिक्षणाचा प्रवास सुरू केला होता. खडतर जीवनाच्या वाटेवर काटेरी कुंपनात वेळ मिळेल त्यावेळी अभ्यास करत तिने आईच्या कष्टाला साथ दिली आहे. पुढील शिक्षणासाठी पाबळ येथील कॅालेजमध्ये प्रवेश मिळवला. शिक्षण थांबू नये यासाठी ती देखील आईच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असे. त्यातून शितोळे अॅकेडमीच्या माध्यमातून तिने पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेतले होते.

मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत मुंबईत धावण्याची चाचणी पुर्व द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर घेतली जात आहे. याच ठिकाणी मंगळवार (ता. 8 ) अकराच्या दरम्यान पोलिस भरती प्रक्रिया झाल्यावर विक्रोळी स्थानकाकडे जाताना शिरूर येथील शितोळे अॅकेडमीतील चार तरूणींना चार चाकी वाहनाने उडविले. यामध्ये काजल कर्डे, दिपाली काळे, चित्राली पांगे आणी चैत्राली दोरगे या तरूणी जखमी झाल्या. त्यामध्ये काळे हिला जास्त दुखापत असल्याने तिला सायनच्या टिळक रूग्णालयातील अतीदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. या वाहन चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या दरम्यान शितोळे अॅकेडमीचे प्रशिक्षक संजय शितोळे म्हणाले की, पालकांना या परीसरात प्रवेश नाही. त्यामुळे मुलींना असुरक्षीत वाटते. त्या पाठापोठ चुकीच्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया होत आहे. काळे हिने गोळा फेक, 100 मिटर धावणे, लांब उडी, 800 मिटर धावणे हे क्रिडा प्रकार पुर्ण केले होते. त्यानंतर रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. तिच्या उजव्या हाताला लागले आहे. पाठीला मार असला तरी तिची प्रकृती ठिक असून, सध्या तिला जनरल वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. इतर तिन मुलींची प्रकृत्ती स्थीर आहे.

पोलिस भरतीत क्रीडांगण परीक्षा झाली असली तरी यामध्ये मिरीट लागणार आहे. त्यातून पुढे लेखी परीक्षा दिली जाणार आहे. त्यामध्ये हा अपघात झाल्याने पोलिस भरती होऊन दिपालीच्या आईचे स्वप्न पुर्ण होणार की नाही? हा प्रश्नच आहे. या गरीब कुटूंबाला तिच्यामुळे एकमेव दिलासा असून अजून दोन बहिनी तिच्या अधिकारी झाल्यावर शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत. दरम्यान, चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी तिची भेट घेऊन तत्काळ मदत उभी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com