लोहमार्गालगत पुरली तीन महिन्यांची बालिका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

देहूरोड - तीन महिन्यांच्या बालिकेस दोन अनोळखी महिलांनी किवळे गावाच्या हद्दीत देहूरोड ते आकुर्डी स्थानकादरम्यान लोहमार्गालगत पुरल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 17) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी दोन अनोळखी महिलांविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजू गोविंद साळवे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. 16) रात्री दोन अनोळखी महिला लोहमार्गालगत खोदाई करताना एका सजग नागरिकाने पहिले. हा काय प्रकार आहे? असा संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. देहूरोड ग्रामीण व देहूरोड लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नायब तहसीलदार संजय भोसले आणि डॉ. प्रवीण कानडे यांच्या उपस्थितीत खोदाई करून त्या बालिकेला बाहेर काढले. रविवारी (ता. 17) गुन्हा दाखल केला. मृतदेह तपासणीसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संशयित  महिलांच्या पांढऱ्या रंगाच्या दुचाकीचा (एमएच 14 एलएफ 7690) क्रमांक मिळालेला असून त्यामुळे घटनेच्या मुळाशी जाणे सोपे होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.