समितीच्या प्रवेशद्वारालगतचे वठलेले झाड काढण्याची मागणी

दत्ता म्हसकर
शनिवार, 26 मे 2018

जुन्नर - जुन्नर तालुका पंचायत समितीच्या जुन्या प्रशासकीय इमारतीचा प्रवेश द्वारालगत उंच वठलेले (वाळलेले) झाड उभे आहे. वादळी वाऱ्याने ते अचानक कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

या इमारतीलगत नवीन प्रशासकीय इमारत आहे. जुन्या इमारतीत काही विभाग कार्यरत आहेत. नवीन इमारत झाली असली तरी जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत जा-ये सुरू असते. जोराच्या वाऱ्याने वाळलेल्या झाडाच्या लहान मोठया फांद्या पडत असतात. येत्या काही दिवसात पाऊस सुरू होणार आहे. त्यावेळी वादळी वाऱ्याने वेठलेले हे झाड कोसळून एखादी दुर्घटना होण्यापूर्वी ते काढून टाकण्याची मागणी होत आहे.

Web Title: Demand for removal of greased tree