सांगवी, दापोडीतील धोकादायक खड्डे दुरूस्तीची मागणी

Demand for repair potholes at sangvi and dapodi
Demand for repair potholes at sangvi and dapodi

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील शिक्षक सोसायटी ते मुळानदी किनारा रस्ता वळणापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. उतार रस्ता व सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्याबरोबरच रस्त्यावर चिखल होत असल्याने नागरीकांना येथुन जिव मुठीत घेवुन चालावे लागते. समोरच या रस्ता वळणावर शाळा आहे.

शाळा सुटण्या व भरण्याच्या वेळेला विद्यार्थी व पालकांची या रस्त्यावर मोठी गर्दी असते. यातच ये जा करणारी वाहने येथील मोठ्या खड्ड्यात अडकल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. मुळा नदी किनारा रस्त्याने पुणे औंधकडून येणारी वाहने या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर रहदारीसाठी वापर करतात यामुळे या रस्त्यावर सकाळी व रात्री मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते येथील धोकादायक खड्ड्यांची दुरूस्ती व्हावी अशी नागरीक, पालक, विद्यार्थ्यांमधून मागणी होत आहे. याच बरोबर दापोडी पिंपळेगुरव रस्त्यावरील भुमिगत चेंबरच्या भोवती धोकादायक खड्डे पडल्याने हे खड्डे अपघाताचे कारण बनु शकतात. रस्त्यात अचानक येणाऱ्या खड्ड्यामुळे येथे दुचाकी आदळ्याचे प्रकार घडत आहेत.पालिका प्रशासनाने या दोन्ही ठिकाणचे खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.

सांगवीतील राहिलेले खड्डे बुजविण्याबाबत सुचना केल्या आहेत.शिक्षक सोसायटी अंतर्गत आडव्या गल्ली रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटिकरण केले आहे. प्रमुख रस्त्यासाठी जागा मालकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याशी चर्चा करून येथील प्रश्न सोडवला जाईल. - श्री.संतोष कांबळे-नगरसेवक

जेट पँचर तंत्राच्या साहाय्याने प्रभागातील खड्डे बुजवले आहेत. येथील खड्डे तात्काळ दुरूस्त करण्यात येतील. - श्री.शिरिष पोरेडी- अभियंता स्थापत्य ह प्रभाग.

दापोडी पिंपळे गुरव रस्त्यावरील चेंबरभोवती पडलेले खड्डे वेगात येणाऱ्या वाहनांना लक्षात येत नाहीत. यामुळे अपघात होतात. येथील दुरूस्ती करावी. - श्री. नरेश आनंद मानवअधिकार संस्था

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com