इंदापूर तालुक्यात ‘हेड टू टेल’ पाणी देण्याची मागणी

farm
farm

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर ते अंथुर्णे परीसरातील शेतकऱ्यांना गत वर्षीपासुन नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळण्यास विलंब होत असून शेतकऱ्यावर अन्याय होत अाहे. शेतकऱ्यांची पिके जळत असून  ‘टेल टू हेड’ ऐवजी  ‘हेड टू टेल’ पद्धतीने पाण्याचे आवर्तन दिल्यास तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्यास मदत होणार आहे. 

इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील सणसर,कुरवली, तावशी, उद्धट, बेलवाडी,लासुर्णे,जंक्शन,कळंब,रणगाव,अंथुर्णे परीसरातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याच्या ३५ ते ४८ क्रंमाकाच्या वितरिकेमधून पाणी देण्यात येते. तर निमगाव केतकी उपविभागातील शेळगाव, गोतोंडी, निमसाखर, निरवांगी, खोरोची, रेडा, रेडणी, लाखेवाडी, निमगाव केतकी, घोरपडवाडी, सराफवाडी, काटी, वडापुरी या परीसरातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याच्या ४९ ते ५९ क्रंमाकाच्या वितरिकेमधून कालव्याचे देण्यात येते.

प्रत्येक वर्षी टेल टू हेड पद्धतीने पाण्याचे आवर्तन सुरु असल्याने निमगाव उपविभागतील गावांना कालवा सुटल्यानंतर पाण्याचे आवर्तन देण्यास सुरवात करण्यात येते.

इंदापूर तालुक्यामध्ये नीरा डाव्या कालव्यामध्ये भवानीनगर पासुन निमगाव केतकी पर्यंत सुमारे २०० पेक्षा जास्त सायफन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्यामुळे  टेल पर्यत पाणी नेण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते.यामुळे निमगाव केतकी उपविभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळ लागत असल्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लाभक्षेत्रातील पिके पाणी येईपर्यत जळून जातात.गतवर्षी सात हजार एकरावरील पिके जळून खाक झाली होती.

यावर्षी ही निमगाव उपविभागामध्ये ४५ दिवसापासुन पाण्याचे आवर्तन सुरु असुन आत्तापर्यत निमगाव केतकी उपविभागातील सिंचनासाठी सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. पाणी चोरी व गळतीमुळे पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना चालू वर्षी ही पाणी मिळण्यास विलंब झाला झाला असून पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. 

निमगाव केतकी उपविभागामध्ये उन्हाळी हंगामातील सिचंनासाठी ४५ दिवसांचा कालवधी लागतो. तर बारामती विभागातील इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सिंचनासाठी २० दिवसांचा कालवधी लागतो.हेड टु टेल पद्धतीने पाण्याचे आवर्तन सुरु केल्यास तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेमध्ये पाणी मिळेल. व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होण्यास मोलाची मदत होते.

खडकवसाल्याचे ३.९ टीएमसी पाणी सणसर कटमधून नीरा डाव्या कालव्यामध्ये सोडण्यात येत होते. मात्र गेल्या चारवर्षापासुन हे पाणी येत नसल्यामुळे नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावती अतिरिक्त ताण येत असून खडकवासल्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यामधून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com