प्रगतशील शेतकऱ्याचा कृषी विभागाकडून सन्मान

junnar
junnar

जुन्नर (पुणे) : ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत शेतीत  उल्लेखनीय काम केलेल्या जुन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी विभागाचे वतीने एका समारंभात सन्मान करण्यात आला. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा,पुणे व कृषी विभाग,जुन्नरच्या वतीने  पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीचे नवीन तंत्रज्ञान माहिती कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी हा सन्मान करण्यात आला. 

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपसभापती उदय भोपे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उल्हास नवले, संतोष सहाणे, जमीर कागदी आदी मान्यवर व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
सेंद्रिय भाजीपाल्याची थेट विक्री करणाऱ्या गोळेगाव येथील पल्लवी गणेश हांडे यांच्यासह बाळासाहेब नाथा काकडे, वैशाली राजेंद्र पवार, विलास प्रकाश डुंबरे, जयवंत रभाजी जाधव, जयराम अनाजी नवले, बाळासाहेब मुरकुटे, अब्दुल सत्तार इनामदार, विकास चव्हाण, राजाराम चौधरी यांना अनुक्रमे मुक्त गोठा पद्धती,आंबा बाग, देशी गाईचा गोठा, सेंद्रिय शेती,चार सूत्री भात, बटाटा, ज्वारी, फुलशेती, यात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल सत्यशील शेरकर व उदय भोपे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश गाढवे तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com