सर्वांना बरोबर घेऊन विकास - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

उंड्री - ""राष्ट्रवादी पक्षाने सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुण्याचा विकास केला असून, हा पक्ष वचनपूर्तीचे राजकारण करणारा आहे,'' असे उद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. 

सय्यदनगर येथील ईदगाह मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. नगरसेवक फारुक इनामदार यांच्या निधीतून होत असलेला महंमदवाडीतील जुना पालखी मार्ग व हांडेवाडी रस्त्यावरील मंडईचे भूमिपूजन; तसेच सहा डीपी रस्त्यांचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सय्यदनगर, काळेपडळ, महंमदवाडीतील 52 कोटींची विकासकामे करून दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या महंमदवाडी प्रभाग

पोटनिवडणुकीत दिलेले आश्वासन राष्ट्रवादीने पाळले, असेही पवार म्हणाले. 
या वेळी महापौर प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, नगरसेवक चेतन तुपे, रंजना पवार, विजया कापरे, नंदा लोणकर, माजी महापौर वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले; तसेच पक्षाचे पदाधिकारी मंगेश तुपे, राकेश कामठे, कलेश्वर घुले, संजय घुले, सागरराजे भोसले, प्रवीण तुपे, अतुल तरवडे, सुनील बनकर, सुफियान इनामदार, नारायण लोणकर आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""युती सरकारने पुणे मेट्रोचे उद्‌घाटन घाई गडबडीत केले. मेट्रोसाठी पूर्वीचा स्वारगेट ते पिंपरी मार्ग बदलून कात्रज ते निगडी असा मार्ग केला. केंद्रात व राज्यात युतीचे सरकार असताना प्रकल्पात त्रुटी राहिल्या.'' 
नोटाबंदी निर्णयाचा समाचार घेताना ते म्हणाले, ""आरबीआयने 2000 रुपयांची नोट काढून काळ्या पैशावाल्यांची सोयच केली आहे. सव्वाशे कोटी जनतेला याचा त्रास भोगावा लागला आहे. असे सरकार यापूर्वी कधीच पाहिले नाही. सरकारने अशा प्रकारे जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. नोटाबंदीचा निर्णय अंगाशी आल्यावर आता डिजिटलची टूम काढली.'' 

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुफियान इनामदार यांनी केले, तर आभार नगरसेविका नंदा लोणकर यांनी मानले. 

कोंडी सुटणार 

नगरसेवक फारुक इनामदार यांनी सांगितले, की जुन्या पालखी मार्गामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे, तर भाजी मंडईमुळे हांडेवाडी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा मिळणार आहे. बूस्टर पंप लावल्यामुळे तरवडे वस्ती येथील पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.