विकासकामात राजकारण नको - पालकमंत्री बापट

girish bapat
girish bapat

पुणे(औंध) - "म्हाळूंगे भागात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून होत असलेली नगरनियोजन योजना ही देशातील आदर्श योजना होणार आहे. यासाठी या भागातील नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच या भागात होत असलेल्या विकास कामांचे श्रेय कोणाला घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे परंतू विकास कामात राजकारण करू नये. कारण या भागात आम्हाला विकास करून आदर्श परिसर बनवायचा आहे" असा मनोदय पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. म्हाळूंगे ग्रामपंचायतीला कचरा वाहतुकीसाठी पीएमआरडीएच्या वतीने पाच गाड्या भेट देण्यात आल्या या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, मुळशी पंचायत समितीच्या सभापती कोमल बुचडे, सरपंच मयुर भांडे, उपसरपंच रूपेश पाडाळे, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ  उपस्थित होते. 

पुढे बोलतांना बापट म्हणाले "या भागातील रस्त्यावर जवळपास शंभर कोटी रूपये खर्च करण्याचे नियोजन असून, रस्ते चांगले झाले तर दळणवळणासह इतर बाबीही सुकर होणार आहेत. यासाठी नवीन बांधकामातून मिळणा-या करातून कामे केले जातील. त्याचबरोबर या भागातील पाणी समस्या, कचरा व्यवस्थापन याविषयीचे नियोजनही नागरीकांच्या सहकार्याने केले जाईल. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याची बचत, पुनर्वापर यावर भर देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. तसेच प्राधिकरणाच्या माध्यमातून अंतर्गत व मुंबईला जोडणा-या रिंगरोडची निर्मिती करून वाहतुकीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांना सांगितले

पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यावेळी बोलतांना म्हणाले "हिंजवडी प्रमाणेच या भागातील विकास होईल. म्हाळूंगे, सूस, बावधनसह यात समाविष्ट सहा गावांच्या पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी पाणी आरक्षणाची योजना, कचरा व्यवस्थापन व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही नगरनियोजन योजना अंतिम टप्प्यात असून पुढील तीन चार महिन्यात राज्यातील आदर्श योजना म्हणून पुढे येईल. तर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या "या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवतांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावांचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष देऊ. त्याचप्रमाणे इमारती बांधतांनाच कचरा, रस्ता व पाण्याचे अभ्यासपूर्ण नियोजन करायला हवे. कच-याची विल्हेवाट कशी करायची याचाही विचार होणे गरजेचे आहे".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com