विकासकामांत राजकारण नको - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

खडकवासला - ‘निवडणुकीचा हिशेब निवडणुकीत चुकता करा; पण विकासकामांत कोणीही राजकारण करून गावाला वेठीस धरू नका. डोळा ठेवून कामाला विरोध करत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे. 

खडकवासला - ‘निवडणुकीचा हिशेब निवडणुकीत चुकता करा; पण विकासकामांत कोणीही राजकारण करून गावाला वेठीस धरू नका. डोळा ठेवून कामाला विरोध करत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आंबीगावातील चार किलोमीटरच्या मुख्य जोडरस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी ६२ लाख रुपये निधी मिळाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी भीमराव तापकीर, जिल्हा परिषद जयश्री पोकळे, अनिरुद्ध यादव, अरुण राजवाडे, उपसरपंच लक्ष्मण साळुंखे, सदस्या सुभद्रा निवंगुणे, गणेश महामुनी, सुरेखा निवंगुणे, मानसी निवंगुणे, जनाबाई ढेबे, सुरेखा निवंगुणे, मंगल निवंगुणे, बाजीराव पारगे, कुरण सरपंच कीर्ती देशमुख, ग्रामविस्तार अधिकारी रवींद्र सोनवणे उपस्थित होते. 

गावातील आरोग्य उपकेंद्राचे काम रखडले आहे. उपकेंद्र सुरू न झाल्याने गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. पुढील महिन्यात त्याचे उद्‌घाटन करणार आहे. आंबी गाव दारू व व्यसनमुक्त गाव झाले पाहिजे. ग्रामीण पोलिस दलातील हवेली वेल्हा पोलिसांनी आंबी पानशेत परिसरातील दारूधंदे बंद करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी दिले
तापकीर म्हणाले, की शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी अनेक गावांतील सरपंच, ग्रामसेवक वेळेत प्रस्ताव देत नाहीत. या गावातून मुख्यमंत्री आवास योजनेसाठी २५५ लोकांनी अर्ज भरले आहेत. अर्ज जमा झाल्याचे एसएमएसदेखील मिळाले आहेत. या प्रकारे काम करणाऱ्या गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल.

Web Title: development work politics girish bapat