देवगड हापूसच्या "ब्रॅंड'साठी शेतकरी एकत्र 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या दुसऱ्या आंब्यांची विक्री रोखण्यासाठी आता देवगड तालुक्‍यातील शेतकरी, व्यापारी एकत्र आले आहेत. या क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या आंब्याचा "ब्रॅंड' निर्माण करून तो ग्राहकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. मार्केट यार्ड येथील एका अडतदाराकडे त्यांची विक्री प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. 

देवगड तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम ओगले, खजिनदार विद्याधर जोशी, उपाध्यक्ष दत्तात्रय बलवान, पुण्यातील व्यापारी शेखर कुंजीर, सिद्धार्थ कुंजीर या वेळी उपस्थित होते. 

देवगड तालुक्‍यात छोटे-मोठे बागायतदार आणि व्यापारी अशी चार हजार कुटुंबे आंबा व्यवसायाशी निगडित आहेत. आंब्यामध्ये देवगड हापूस चवीला उत्तम मानला जातो. या आंब्याचे नाव वापरून दुसऱ्या हापूस आंब्याची विक्री केली जात असल्याची तक्रार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

""देवगड तालुक्‍यात आंब्याचे उत्पादन 40 हजार मेट्रिक टन होते. त्यापैकी 25 टक्के माल "कॅनिंग'साठी जातो. उर्वरित बहुतेक माल मुंबईतील बाजारपेठेत पाठविला जातो. पुण्यात हा आंबा अत्यल्प प्रमाणात विक्रीला येतो; परंतु देवगड हापूसच्या नावाखाली येथे इतर आंब्याची विक्री सुरू आहे. 

हे प्रकार रोखणे, आंब्याची उत्पादकता वाढविणे, वितरणाचे जाळे तयार करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. आंब्याचे "ब्रॅंडिग' करण्यासाठी दोन डझनांचे बॉक्‍स तयार केले आहे. या बॉक्‍सवर उत्पादक शेतकऱ्याचा कोड क्रमांक, संघाचा संपर्क क्रमांक, शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आदी माहिती दिली जाणार आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मदत होईल,'' असे ओगले यांनी सांगितले. 

असा ओळखा देवगड हापूस 

प्रत्येक आंब्याची वजनानुसार प्रतिवारी केली जाणार आहे. प्रत्येक आंब्याचे वजनानुसार पाच गट करून त्याचे भाव निश्‍चित केले जातील. एका आंब्याचे वजन तीनशे ग्रॅम वजनापेक्षा अधिक असणार नाही. यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा मिळेल. देवगड हापूस आंब्याचा आतील गर केशरी असतो. साल पातळ असते. या आंब्याचा प्रतिडझनाचा भाव 300 ते 700 रुपये राहील, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Devgad hapus mango