धंगेकर विरुद्ध बिडकर सामना होण्याची चिन्हे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - शहराच्या मध्यभागातील कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातील (16) मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या शक्‍यतेची चर्चा रंगली असतानाच अचानकपणे त्यांनी कॉंग्रेसप्रवेशाचा निर्णय घेतल्याने लढतीत रंगत निर्माण झाली आहे. 
मात्र, उमेदवारांची यादी निश्‍चित होताना त्यात अचानक काही हस्तक्षेप होण्याची शक्‍यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. 

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांचे या प्रभागावर विविध राजकीय संदर्भांमुळे जरा "जास्तच' लक्ष आहे. भाजपकडून बिडकर आणि योगेश समेळ यांची उमेदवारी निश्‍चित समजली जाते. उर्वरित महिलांच्या दोन जागा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत. कॉंग्रेसकडून धंगेकर यांच्यासमवेत आता सदानंद शेट्टी यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. तेथेही महिलांच्या दोन जागा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत; तर राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू आहे. 

शेट्टी हे खुल्या गटातून; तर धंगेकर हे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकडून, भाजपकडून समेळ खुल्या गटातून; तर गणेश बिडकर हे मागास गटातून निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेट्टी विरुद्ध समेळ आणि बिडकर विरुद्ध धंगेकर अशी लढत होऊ शकते. मात्र, उमेदवार निश्‍चित करताना सुरक्षिततेसाठी बिडकर यांना खुल्या गटातून उमेदवारी दिल्यास समेळ यांना धंगेकर यांच्याविरुद्ध लढावे लागेल. दरम्यान, धंगेकर हे भाजप, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा असताना, त्यांच्या कॉंग्रेसप्रवेशामुळे कसब्यातील राजकीय वातावरण सोमवारी ढवळून निघाले.

पुणे

पुणे : "बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानवाद पोचू शकत नाही. परंपारांच्या आधीन गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या लखलखीत वैज्ञानिक...

01.48 PM

पुणे : "ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत 'गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण' असल्याचे म्हणत असतील, अशा देशात...

01.12 PM

पुणे : "अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र...

11.39 AM