स्वप्नीलची स्वप्नवत कामगिरी...

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 27 जून 2017

धुळे : युपीएससच्या परीक्षेत स्वप्नीलने स्वप्नवत कामगिरी केली आहे. गावाचाच नव्हे तर जिल्ह्याचा नाव लौकिक वाढविला आहे. आठ वर्षांनंतर जिल्ह्याचा डंका युपीसीत वाजला आहे. स्वप्नीलचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पंधराशेच्या वस्तीतील आणि जिल्हा परीषद शाळेत शिक्षण झालेल्या स्वप्निलच्या कौतुकासाठी आज सार्‍या गावानेच आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतीषबाजीत आणि ढोल ताश्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. हे सर्व बघण्यासाठी पंचकृषीतील लोकांबरोबरच राजकिय व शासकिय पदाधिकारीही आले होते. छोट्याशा गावात दिवाळीच साजरी झाली.

कौठळ (ता.धुळे) येथील स्वप्निल सुनील सुर्यवंशी हा युवक यूपीएसी परीक्षेत देशात सहाशे सत्तरव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. दिल्लीहून  निकाला नंतर आज प्रथमच स्वप्नील गावाकडे परतलेत. अन  गुणगौरव समारंभाला  दिवाळीचेच स्वरुप प्राप्त झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी,  माजी मंत्री रोहीदास पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे, माजी आमदार शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सरपंच सरला कौठळकर, कृषी उत्पन्न सरपंच किर्तीमंत कौठळकर, राष्र्टवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश मोरे आदी उपस्थित  होते.

दरम्यान उपस्थित सर्वच मान्यवरांनी स्वप्निलसह शिक्षक दाम्पत्य आईवडील अनिता व सुनील सुर्यवंशीचे कौतुक केले. त्यास दहावीत 95 % व बारावीत 92%टक्के होते. प्राथमिक शिक्षण खेड्यातच तर माध्यमिक शिक्षण धुळे शहरात झाले आहे. या कामगिरीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या ग्रामीण भागातील युवकांचा हूरुप वाढला आहे. तर अभ्यास अन अभ्यास हेच यशाचे गमक असल्याचे स्वप्निल सुर्यवंशी यांनी सांगितले.