मंचर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस मशीन लोकार्पण सोहळा

manchar
manchar

मंचर - “बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंडावर (किडनी) ताण पडतो. ते नादुरुस्त झाले की, पूर्ण जीवन उध्वस्त झाल्याची भावना निर्माण होते. डायलिसीस प्रक्रियेद्वारे रक्त शुध्द करणे, हा एकमेव पर्याय राहतो. अशा रुग्णांना डायलिसिस सेंटर हाच आधार असतो. येथे सहा डायलिसीस मशीन रुग्णांना वरदान ठरतील.’’ असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मंचर उपजिल्हा रुग्णालयाला भीमाशंकर कारखान्यातर्फे दोन व रजनी प्रकाश शहा फौंऊडेशन तर्फे एक अशा तीन डायलेसिस मशीन भेट देण्यात आल्या. उद्योजक देवेंद्र शहा यांच्या वाढदिवसानिमित्त डायलिसीस मशीनचा लोकार्पण सोहळा वळसे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २१) झाला. यावेळी किरण वळसे पाटील, जिल्हा शल्यचिकीस्यक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रकाश शहा, राहुल काळभोर, डॉ. वर्षा शिवले, देवदत्त निकम, बाळासाहेब बेंडे, नेत्रा शहा उपस्थित होत्या.  

वळसे पाटील म्हणाले, "लग्न सभारंभ व अन्य कार्यक्रमात बचत करून नागरिक रुग्णालयाला आर्थिक मदत करतात. रजनी प्रकाश शहा फौंऊडेशन, मोरडे फुड्स, शरद बँक व भीमाशंकर कारखान्याकडून वेळोवेळी मदत होते. यापूर्वी देवेंद्र शहा यांनी जवळपास चार हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचे काम केले आहे. जैन समाजाने करोडो रुपये किमतीची जागा विनामुल्य रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी निवारा करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाईल.’’ 

रजनी प्रकाश फौंडेशनचे विश्वस्त प्रीतम शहा म्हणाले, "माझे बंधू (कै) पराग शहा यांच्यावर डायलिसीस उपचार पुण्यात सुरु होते. त्यासाठी करावी लागणारी धावपळ मी अनुभवली आहे. बंधू देवेंद्र शहा यांच्या वाढदिवसानिमित्त डायलिसीस मशीन दिले आहे.’’ कार्यक्रम सुरु असतानाच मोरडे फूड्सचे संचालक हर्षल मोरडे यांनी अजून एक डायलिसीस मशीन देण्याचे जाहीर केले. 

वाघाळे-रांजणगाव येथील विजय भानुदास थोरात यांनी ५० हजाराचा धनादेश रुग्णालयाला दिला. 

“विधानसभेचे अध्यक्ष असताना दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे शासनाने दोन डायलिसीस मशीन पूर्वी उपलब्ध करून दिल्या. पण अजूनही अनेक रुग्ण प्रतीक्षा यादीवर होते. त्यांना पुणे व मुंबईला उपचारासाठी धावपळ करावी लागत होती. चांडोली बुद्रुक येथील एक रुग्ण मुंबई येथे डायलिसीस उपचार घेऊन पत्नी व मुलासोबत मंचरला येत असताना कामशेत जवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवर असलेल्या रुग्णांच्या सोयीसाठी वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन तातडीने भीमाशंकर कारखाना व रजनी प्रकाश शहा फौंडेशनच्या मदतीने तीन व मोरडे फुड्स यांची एक डायलिसीस मशीन त्यामुळे एकूण डायलिसीस मशीनची संख्या सहा झाली आहे.’’ असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सीमा देशमुख यांनी सांगितले. 

उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, नरेंद्र समदडीया, डी. के.वळसे पाटील यांची मनोगते झाली. जगदीश घिसे यांनी आभार मानले. डॉ. गणेश पवार व डॉ. संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com