सव्वा कोटीच्या जुन्या नोटा दिघी पोलिसांकडून ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पिंपरी - चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा समावेश असलेली एक कोटी ३६ लाख २६ हजार रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या चार जणांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले. रिझर्व्ह बॅंकेत बदलण्यासाठी नोटा घेऊन जात असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पोलिसांनी अधिक तपासासाठी चौघांना आयकर विभागाच्या ताब्यात दिले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२४) दिघीतील मॅगझीन चौकात घडली होती.  

संजय पलंगे (वय ५०, रा. खुळेवाडी, चंदननगर), नामदेव शिंदे (वय ३४, रा. मोशी), अमित सुतार (वय ३३, रा. कोथरूड) आणि मनोहर शेट्टी (वय ४०, रा. येरवडा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दिघी पोलिस ठाण्यातील गुन्हे तपास पथक (डीबी) परिसरामध्ये गस्त घालत असताना मॅगझीन चौकात एक इनोव्हा (एमएच १२ एचझेड ००७९) फिरत होती.

संशयावरून तिची झडती घेतली असता, जुन्या नोटांचा समावेश असलेली एक कोटी ३६ लाख २६ हजार रुपयांची रोकड सापडली. अधिक चौकशी केली असता, रिझर्व्ह बॅंकेमध्ये या नोटा बदलण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिसांनी चौघांची स्टेशन डायरीमध्ये नोंद करून पंचनामा केला व आयकर विभागाशी संपर्क साधून चौघांना त्यांच्या ताब्यात दिले. पुढील तपास आयकर विभाग करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी सांगितले.