बारामती - एक हजाराहून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप

मिलिंद संगई
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांची सवय लागावी यासाठी येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आज एक हजाराहून अधिक कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले गेले.

बारामती (पुणे) : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांची सवय लागावी यासाठी येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आज एक हजाराहून अधिक कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले गेले.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव यांच्यासह अनेक नगरसेवक व नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. प्लॅस्टिक कॅरिबॅगसह सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर टाळून आता कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर सर्वांनी करावा या साठी प्रबोधन करण्याच्या उद्देशाने फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. गुरुवारी बारामतीचा बाजार असतो. आज गणेश मार्केट मध्ये फोरमच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना या पिशव्यांचे वाटप केले व पुढील काळात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत आवाहन केले. 

Web Title: distribution of more than one thousand cloth bags in baramati