जिल्हा रुग्णालयातील टाइल्स बसविण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कक्षात अवघ्या दोन महिन्यांमध्ये निखळायला लागलेल्या टाइल्स गुरुवारपासून पुन्हा लावण्यास सुरवात झाली. 

औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कक्षाचे नूतनीकरण सुरू आहे. याअंतर्गत भिंतींना पूर्ण टाइल्स लावण्यात येत आहेत. दोन महिन्यांपूर्वी लावलेल्या टाइल्स निखळत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले. त्याची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने या टाइल्स पुन्हा बसविण्यास सुरवात केली. 

याबाबत औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रुद्रप्पा शेळके म्हणाले, ‘‘पडलेल्या सर्व टाइल्स बसविण्यात येत आहेत. या कामाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.’’

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राहुल कदम म्हणाले, ‘‘या टाइल्स रात्रीतून पडल्या आहेत. त्या सर्व टाइल्स तातडीने बसविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कोणालाही प्रवेश देऊ नये, असे सांगितले आहे.’’

पडलेल्या टाइल्स बसविण्याबरोबरच एका समान रेषेत नसलेल्या टाइल्सही पुन्हा बसविण्याची गरज आहे. शस्त्रक्रिया कक्ष निर्जंतूक करण्यात येत असून, त्याला अडथळा येणार आहे. त्याचा विचारही सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्याचे आवाहन येथील डॉक्‍टरांनी केले आहे.