घाबरू नका... "प्लॅस्टिक मनी' वापरा 

plastic-money
plastic-money

केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील एटीएम केंद्रे, बॅंकांबाहेर तसेच अन्य ठिकाणीही पुणेकरांनी गर्दी केली. आपल्याकडील नोटा जमा करून टाकण्याची "मध्यमवर्गीय घाई' योग्य असली तरी सरकारने सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय 

घेतला आहे. सर्व नोटा स्वीकारण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या खिशातील प्रत्येक पाचशे किंवा हजाराची नोट ही बॅंकांकडे जमा होण्यासाठी निश्‍चितच पुरेसा अवधी देण्यात आलेला आहे. 

पंतप्रधानांनी निर्णय जाहीर केल्यानंतर काही क्षणातच पेट्रोल पंप, एटीएम केंद्र आणि टोलनाक्‍यांसह जमेल तिथे नोटा खपविण्यासाठी रांगा लावणारे सजग पुणेकर तेच आहेत जे इंधन दरवाढ झाल्यानंतर आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या टाक्‍या "फुल्ल' करून "महाबचत' करतात. या बचतीमध्ये वावगे काही नसले, तरी शहरामध्ये अनावश्‍यक घबराटीचे (पॅनिक) वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात हाल होतात ते फक्त सर्वसामान्यांचेच. कारण रांगा लावून त्यामध्ये वेळ वाया जाणे, सुट्या पैशांसाठी हुज्जत घालणे आणि त्यातून बिघडणाऱ्या मनस्थितीचा फटका सामन्यांनाच बसत आहे. 

सुट्या पैशांची अपवादात्मक गरज वगळता आता बहुतांश व्यवहार हे डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तसेच ऑनलाइन बॅंकिंगद्वारे होऊ लागले आहेत. पुणेकर 

त्यात आघाडीवरही आहेत. मालमत्ता करापासून वीजबिलापर्यंत आणि शाळांच्या शुल्कापासून केबल सेवा देणाऱ्या डीटीएचचे "रिचार्ज' हेसुद्धा ऑनलाइन करण्यास पुणेकर प्राधान्य देतात. त्यामुळे प्लॅस्टिक मनी व ऑनलाइन व्यवहार पुणेकरांसाठी निश्‍चितच नवीन नाहीत. या संक्रमण काळात घाबरून न जाता सजग पुणेकरांनी आपले वेगळेपण दाखवले पाहिजे. आर्थिक व्यवहारांसाठी नव्या माध्यमांचा वापर आज जरी कोणी टाळला तरी भविष्यात त्याचा स्वीकार करणे अपरिहार्य ठरणार आहे. 

पारदर्शकता आणि अचूकता ही ऑनलाइन व्यवहाराची वैशिष्ट्ये आहेत. याची जाणीव समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोचली पाहिजे. आपल्या घरात स्वयंपाक, घरकाम करणाऱ्या महिलेपासून ते रस्त्यावरील फळभाजी विक्रेत्यापर्यंत सुरक्षित आणि जलदगतीने होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांची माहिती पोचवणे ही आता आपली जबाबदारी आहे. "शिक्षणाचे माहेरघर' आणि "आयटी हब' अशी बिरुदावली मिरवणारे "पुणे' या निमित्ताने "अर्थक्रांती'च्या दिशेने पहिले पाऊल उचलेल हे निश्‍चित! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com