भलत्याच आश्‍वासनांना बळी पडू नका - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पुणे - 'विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, त्या दृष्टीने प्रयत्न करा. विरोधकांकडून भलतीच आश्‍वासने दिली जातील. तेव्हा कोणाचेही ऐकू नका. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, '' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना शनिवारी दिला.

पुणे - 'विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, त्या दृष्टीने प्रयत्न करा. विरोधकांकडून भलतीच आश्‍वासने दिली जातील. तेव्हा कोणाचेही ऐकू नका. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, '' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना शनिवारी दिला.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी महापालिकेतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार अनिल भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या प्रचार यंत्रणेसह पुढील आठवडाभराच्या कामाच्या नियोजनाचा आढावाही पवार यांनी या वेळी घेतला. या काळात सोपविलेली जबाबदारी प्रत्येकाने अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असेही पवार यांनी नगरसेवकांना सांगितले.

'पुणे मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. तरीही विरोधकांकडून आश्‍वासने दिली जातील. या काळात कोणत्याही भूलथापांना अजिबात बळी पडू नका. भोसले यांना सकाळी आठ ते नऊ या वेळेत मतदान करून अन्य मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा,'' असेही पवार यांनी सांगितले.

'निर्णयापूर्वी पर्यायी व्यवस्था हवी होती'
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत पवार यांनी केले; मात्र हा निर्णय घेण्याआधी पर्यायी व्यवस्था उभारण्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत...

08.09 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) संगमनेर येथील गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातीतून घडवू गणेश’...

04.00 PM

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM