डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या डायरीतील संस्मरणीय पाने

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या डायरीतील संस्मरणीय पाने

पुणे : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. या महान व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहण्यासाठी 15 ऑक्‍टोबर हा त्यांचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने वाचन संस्कृती जोपासणारे अनेक उपक्रम आवर्जून केले जातात. 

येत्या वाचन प्रेरणा दिनी 'कलाम पर्व 2018' हा एक अभिनव उपक्रम साहित्यवेध प्रतिष्ठानने बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता आयोजिला आहे. कलामांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभात "सकाळ प्रकाशना'द्वारे प्रसिद्ध "माझ्या डायरीतील पाने' या डॉ. कलाम यांचे सहकारी व सहलेखक अरुण तिवारी यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान "डीआरडीओ'चे डायरेक्‍टर जनरल डॉ. सुभाषचंद्र सती भूषविणार असून, त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होईल. 

'माझ्या डायरीतील पाने' हा "नोट्‌स टू मायसेल्फ' या डॉ. कलाम लिखित पुस्तकाचा माधुरी तळवलकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. डॉ. कलाम यांचे आजवर अज्ञात असलेले अनेक पैलू यामध्ये वाचकांना वाचावयास मिळतील. रामेश्‍वरममधील एका छोट्या गावापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंत झालेला डॉ. कलाम यांचा विलक्षण प्रवास हेही या पुस्तकाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. डॉ. कलाम यांच्यामधील अनेक दुर्मीळ गुणांची गरज आजही तरुणाईला प्रेरणा कशी देत आहे, याचाही प्रत्यय हे पुस्तक वाचताना येईल. 

सकाळ प्रकाशनाचा वाचक महोत्सव सुरू असून, वाचकांसाठी दर्जेदार पुस्तके आकर्षक सवलतीत मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे. "माझ्या डायरीतील पाने' हे 140 रुपये किमतीचे पुस्तक कार्यक्रमस्थळी, सकाळ मुख्य कार्यालय, आवृत्ती कार्यालये आणि वाचक महोत्सवात सहभागी महाराष्ट्रातील 100 हून अधिक पुस्तक विक्रेत्यांकडे 25 टक्के सवलतीत उपलब्ध असेल. 

अधिक माहितीसाठी : 595, बुधवार पेठ, पुणे 2 किंवा 8888849050 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
ऑनलाइन : amazon.in / sakalpublications.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com