धामणीत तालुकास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

सुदाम बिडकर  
रविवार, 15 एप्रिल 2018

आंबेगाव तालुका जयंती उत्सव समिती आणि परिवर्तन फाउंडेशन (धामणी) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय जयंती साजरी करण्याचा मान यावर्षी धामणी या गावाला मिळाला.

पारगाव (पुणे) - धामणी ता. आंबेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टर मधुन डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आंबेगाव तालुका जयंती उत्सव समिती आणि परिवर्तन फाउंडेशन (धामणी) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय जयंती साजरी करण्याचा मान यावर्षी धामणी या गावाला मिळाला. धामणी ग्रामस्थ आणि परिवर्तन फाउंडेशन यांनी नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्वी केला. काल शनिवारी सकाळी धामणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे धामणी गावातील चावडी मध्ये बुदधवंदना घेण्यात आली. संध्याकाळी चार वाजता मिरवणूकीला सुरुवात झाली. आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंबेगाव तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रा. सुधीर रोकडे यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान झाले. 

याप्रसंगी तहसीलदार रविंद्र सबनीस, भुमी अभिलेख उपअधीक्षक अशोक शिलवंत, माजी नगरसेवक लोखंडे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, अॅड विठ्ठल जाधव ,सरपंच सागर जाधव पाटील, आंबेगाव तालुका जयंती उत्सव समितीते अध्यक्ष अनिल अभंग, महेश वाघमारे, अरुण वाव्हळ, सचिन ढोणे, सोनु अभंग, माजी सरपंच अंकुश भुमकर, सुनिल जाधव, अध्यक्ष नितीन जाधव, मिलिंद शेळके, पांडुरंग ससाणे, दिनेश जाधव,
अमोल जाधव, गणेश ससाणे उपस्थित होते प्रास्ताविक चिंतामण जाधव, सुधाकर जाधव यांनी केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Dr Babasaheb Ambedkar Jayanti Celebrate in Dhamani