अवसरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये सर्वधर्मीयांचा मोठा सहभाग 

सुदाम बिडकर 
रविवार, 15 एप्रिल 2018

डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये परिसरातील सर्वधर्मीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पारगाव (पुणे) - अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये परिसरातील सर्वधर्मीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीच्या सुरवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम रोकडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बसस्थानकापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूकीमध्ये भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे, माजी जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर, बाळासाहेब टाव्हरे, उत्तम टाव्हरे, अशोक योगीराज हिंगे, सचिन रोकडे, श्रीहरी हिंगे, सी. आर. रोकडे, शशी गायकवाड, मारुती आचार्य उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Dr Babasaheb Ambedkar Jayanti Celebrates in Avsari Pune