‘तंत्रज्ञान, खर्चाचा समतोल राखण्यात दमछाक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पुणे - ‘‘वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मागे धावण्यात वैद्यकीय तज्ज्ञांची दमछाक होत आहे. एका बाजूला रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्याचे आव्हान आहे; तर दुसरीकडे या तंत्रज्ञानामुळे वाढणारा उपचारांचा खर्च यात समतोल राखताना डॉक्‍टरांना कसरत करावी लागत आहे,’’ असे हैदराबाद येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. के. पी. रेड्डी यांनी शनिवारी येथे सांगितले.

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतर्फे (एनआयओ) राष्ट्रीय पातळीवर आयोजित परिषदेत डॉ. रेड्डी बोलत होते. या निमित्ताने ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते डॉ. रेड्डी यांना ‘डॉ. ए. एम. गोखले पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, डॉ. संजय पाटील, डॉ. आदित्य केळकर, डॉ. जाई केळकर उपस्थित होत्या. डॉ. आदित्य केळकर यांनी प्रास्ताविक केले.
 डॉ. रेड्डी म्हणाले, ‘‘डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी प्रथम लेजरचा वापर करण्यात आला. तेव्हापासून लेजरमध्ये सुधारणा सुरू झाल्या. आता शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत.’’

 वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, हे बदल रुग्णांसाठी निश्‍चितच उपयुक्त आहेत; पण या उपचारांचा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सेवा देण्यासाठी डॉक्‍टरांना ते तंत्रज्ञान घ्यावे लागते. अशा वेळी रुग्णसेवा आणि त्याचा खर्च असे दुहेरी आव्हान डॉक्‍टरांसमोर असते.
- डॉ. के. पी. रेड्डी, नेत्रतज्ज्ञ

Web Title: dr. k. p. reddy talking