इंदापुरात वाळूवाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था

इंदापुरात वाळूवाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये वाळूमाफियांकडून वाळू उपसा व वाळूची चोरटी वाहतूक जोमाने सुरु आहे. ओव्हरलोड वाळूवाहतुकीमध्ये तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरवात झाली असून, कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वाळूवाहतुकीच्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे यांनी केली आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये सध्या वाळूमाफियांनी जोमाने वाळूउपसा व वाळूवाहतुकीस सुरवात केली आहे. दिवसाही वाळूचे टिपर भरधाव वेगाने धावताना दिसत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वाळू टिपरमधून वाहतुक होत असल्याने रस्ते खचण्यास सुरवात झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते तयार करताना वाहनाचे वजन सोडून ८ ते १० टन भारसहन करतील अशा पद्धतीने तयार केलेले असतात. मात्र, वाळूमाफिया टिपरमधून एकावेळी १५ ते २० टन वाळू घेऊन जात असल्याने रस्त्यांची वाट लागत आहेत.

रस्ते खचून रस्त्याला खड्डे पडत आहेत. ओव्हरलोड वाळू वाहतुकीमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेले रस्ते खराब होणार असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वालचंदनगर - डाळज रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले होते. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम नुकतेच केंद्रीय मार्गी निधीमधून मार्गी लागले अाहे. मात्र, बेसुमार चोरट्या वाळूवाहतुकीमध्ये या रस्त्याला नव्याने खड्डे पडण्याची शक्यता असुन शासनाचा २० कोटी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली अाहे. प्रशासनाने वाळूमाफियावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख योेगेश कणसे,  युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सुदर्शन रणवरे,  युवा सेनेचे इंदापूर प्रमुख तालुका संदीप चौधरी, लखन साळुंके, दत्तात्रेय खुडे, संतोष सावंत,निलेश चव्हाण  यांनी रणगाव-वालचंदनगर रस्त्यावरच्या वाळूवाहतुकीमुळे पडलेल्या खड्यामध्ये वृक्षारोपन करुन वाळूउपसा बंद करण्याची मागणी केली. 

बिगर नंबरच्या टिपरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

तालुक्यातील वाळू माफिया बिगर क्रंमाकाचे टिपरचा वाळूवाहतुकीसाठी वापर करीत आहेत. याकडे पाेलिस, महसुल, परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत आहे. याची आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे योगेश कणसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com