पुरस्कारांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळते - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - ‘‘सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कारांमुळे बळ मिळते. पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशनने कार्यकर्त्यांना हे बळ देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, ट्रस्टचे सचिव गणेश चव्हाण, महेश शहाणे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डॉ. अनुराधा खाडिलकर, डॉ. पराग रासने, चंद्रकांत निनाळे, अशोक जाधव, उदय जगताप, अजय दुधाणे, प्रा. रवींद्र शाळू, चंदन सुरतवाला, गणेश टोकेकर यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन सुरतवाला यांनी केले. शहाणे यांनी आभार मानले.