मिळकत कर भरल्याने सदस्यत्व रद्द

due to tax refund Termination of post
due to tax refund Termination of post

टाकवे बुद्रुक : ग्रामपंचायत हद्दीमधील मिळकतकर मुदतीमध्ये न भरल्याने टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अश्विनी शिवाजी असवले आणि मीना सुरेश असवले अशी या महिला ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक 4 ऑगस्ट 2015ला झाली होती. या निवडणुकीत दोन्ही सदस्या विजयी झाल्या होत्या. 

त्यांच्या विरुद्ध माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. गायकवाड यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर गायकवाड यांनी आयुक्तांकडे दाद मागितली होती. आयुक्त सुभाष डुंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णय रद्दबातल करून गायकवाड यांच्याबाजूने निकाल देऊन दोन्ही महिला सदस्याचे पद रद्द केले होते. त्यानंतर असवले यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत दोन्ही महिला सदस्यांचे पद रद्द आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com