पुलांच्या ठिकाणी कालव्याची कचराकुंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

बिबवेवाडी - मुठा उजवा कालव्यावरील पुलांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा, निर्माल्य टाकल्यामुळे पुलालगत कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप आले असून, मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे.

बिबवेवाडी - मुठा उजवा कालव्यावरील पुलांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा, निर्माल्य टाकल्यामुळे पुलालगत कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप आले असून, मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे.

सारसबाग, स्वारगेट, डायसप्लॉट झोपडपट्टीजवळील कालव्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात कचरा कालव्यात टाकला जातो. त्यामुळे पुलालगत मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहतो. त्यामुळे अर्धा कचरा पाण्यात व अर्धा कालव्याच्या कठड्यावर अडकून राहतो. त्यामुळे भटकी जनावरे, कुत्री कचऱ्यावर गेल्यावर पाण्यात पडून वाहून जातात. कालव्याशेजारील जागेमध्ये अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यातच कचरा साठला असल्यामुळे येथे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याच प्रश्न निर्माण होत आहे. महापालिकेने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी "गुडमॉर्निंग पथक' नेमले आहे; परंतु सकाळच्या वेळेस पथक असते. त्यामुळे दुपारी, सायंकाळी पथक नसल्याचा फायदा घेत नागरिक कालव्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. कालव्या शेजारील जागेमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला आहे. त्यामुळे राडारोडा साठून कालव्यात पडत असून, त्यामुळे कालव्याच्या सीमा भिंतीलाही धोका पोचत आहे.

पुणे

पुणे : "बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानवाद पोचू शकत नाही. परंपारांच्या आधीन गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या लखलखीत वैज्ञानिक...

01.48 PM

पुणे : "ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत 'गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण' असल्याचे म्हणत असतील, अशा देशात...

01.12 PM

पुणे : "अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र...

11.39 AM