आता प्रत्येक पुणेकरासाठी ई-कनेक्‍टिव्हिटी

E-Connectivity
E-Connectivity

पुणे - रस्त्यावरून चालताना तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट वापरण्याची गरज नाही. प्रत्येक पुणेकराला स्मार्ट सिटीमध्ये वाय-फायचे कनेक्‍शन मोफत मिळेल. इतकेच नाही, तर स्मार्ट टॉयलेट, स्मार्ट बस स्टॉप आणि शहराचे डिजिटल मॅप चौका-चौकांत असतील. स्मार्ट सिटी कंपनी किंवा महापालिकेला एक रुपयाचीही गुंतवणूक न करता हा प्रकल्प राबविता येणार आहे अन्‌ त्यासाठी राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्याही सरसावल्या आहेत. आता फक्त महापालिकेने मंजुरी दिली, तर पुढील महिनाअखेरीस प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते.

संपूर्ण शहरात मोफत वाय- फाय, स्मार्ट टॉयलेट्‌स, ई- वाहनांसाठी चार्जिंग डॉक, शहराचा डिजिटल मॅप आदी बहुविध प्रकल्प आता नागरिकांसाठी एका क्‍लिकवर खुले होऊ शकतात. स्मार्ट सिटी कंपनीने त्यासाठी ई- कनेक्‍टिव्हिटी प्रकल्प तयार केला असून, मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सादर केला आहे. मंजुरीची प्रक्रिया वेळेत झाली, तर अवघ्या ४५ दिवसांत प्रकल्पाचे काम सुरू होईल.

गुंतवणूक कंपनीची
प्रकल्पाची किंमत - सुमारे २२० ते २५० कोटी
‘पीपीपी’द्वारे प्रकल्प - महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीऐवजी संबंधित कंपनी सर्व गुंतवणूक करणार

सहभागी कंपनीला मिळणारा परतावा 
प्रीमियम वाय-फायद्वारे उत्पन्न
ई-कॉमर्स, स्मार्ट बसथांब्यांवरील जाहिरातींच्या महसुलातील काही भाग मिळणार
कंत्राटाची मुदत १५ वर्षे

 ई- कनेक्‍टिव्हिटी हा प्रकल्प यापूर्वी औंध, बाणेर, बालेवाडीमध्येच राबविण्याचे ठरविले होते. परंतु, त्याची प्रक्रिया सुरू केल्यावर संपूर्ण शहरात हा राबविता येईल, असे लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक पुणेकराला डिजिटल कनेक्‍टिव्हिटी मिळणार आहे. शहर डिजिटल होण्यासाठी ही उत्तम संधी आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीचा प्रयत्न सुरू आहे. 
- राजेंद्र जगताप, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

असा आहे प्रकल्प 
    ई - कॉरिडॉर - ई- कॉरिडॉरच्या माध्यमातून संपूर्ण शहरात सर्व रस्त्यांवर मोफत वाय-फाय सुविधा पुणेकरांना मिळणार  
    स्मार्ट बस स्टॉप उभारणार ५०० ठिकाणी - डिजिटल बोर्डद्वारे वेळापत्रक, वाय-फाय सुविधा, बस स्‍टॉप आयटीएस सिस्टिमला जोडणार.  शहराची, पीएमपीची संपूर्ण माहिती देणारी किऑस १०० बस स्टॉपवर
    स्मार्ट टॉयलेट (फ्रेश स्टॉप) होणार ५०० ठिकाणी -  सोलरचा वापर, महिला- अपंगांसाठी उपयुक्त सुविधा, साबण- आरसे असणार, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि क्रशिंग आदी सुविधा 
    स्मार्ट पोल उभारणार २००० ठिकाणी - एकाच पोलवर डिस्प्ले, सर्व प्रकारच्या केबल्स, वाय-फाय राऊटर्स, ई- वाहनांसाठी चार्जिंग डॉक,  ३५० प्रमुख चौकांत उभारणार नेटवर्क केबल. आपत्तीमध्ये त्या पोलवरून संपूर्ण शहरात एकाच वेळी अनाऊन्समेंट शक्‍य. पोलपासून प्रत्येक ठिकाणी २५० मीटरवर मोफत वाय-फाय मिळणार. 
    स्मार्ट डस्टबिन - ५०० ठिकाणी 
    स्मार्ट मॅप असणार ५०० ठिकाणी - शहराचा स्मार्ट डिजिटल मॅप पुणेकरांना दिसणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com