ई-पॉसच्या त्रुटींमुळे रेशन मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

कडूस - स्वस्त धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने ई-पॉस मशिनद्वारे सुरू केलेल्या वितरणात ई-पॉस मशिनवर ठसे न जुळण्यापासून मशिनलाच रेंज मिळत नसण्यापर्यंत अडचणी येत असल्याने शेकडो गरीब व गरजू लाभधारक स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत.  

स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्य योजनेतील काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने नऊ महिन्यांपूर्वी बायोमेट्रिक (ई-पॉस) मशिनद्वारे धान्य वितरणाची सक्ती केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ई-पॉस मशिन प्रणालीत असंख्य त्रुटी राहिलेल्या आहेत. त्याचा फटका लाभधारकांना सोसावा लागत आहे.

आधार लिंकिंग झालेल्या लाभधारकाला धान्य दिले जात असल्याने घरातील प्रत्येक लाभार्थी सदस्याचे आधार लिंकिंग गरजेचे झाले आहे. ज्यांचे आधार लिंकिंग नाही, अशा अनेकांनी आधार लिंकिंगसाठी आधार कार्डची झेरॉक्‍स दुकानदारांकडे जमा केल्या आहेत. दुकानदारांनीसुद्धा या झेरॉक्‍स प्रशासनाच्या ताब्यात दिल्या, परंतु त्यानंतरसुद्धा आधार लिंकिंग होत नसल्याने ग्राहकांना धान्य मिळत नाही. 

‘भीक नको, पण कुत्रं आवर’
दुकानदारच जाणूनबुजून वेळ लावत असल्याच्या संशयाने दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद होतात. यामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. याबाबत ‘भीक नको पण कुत्रं आवर,’ अशी आमची तऱ्हा झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका सरकारमान्य धान्य दुकानदाराने व्यक्त केली आहे.

या आहेत समस्या
ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे न जुळणे, ई-पॉस मशिनलाच रेंज न मिळणे, मिळालीच तर मशिन वारंवार हॅंग अथवा बंद पडणे, असे अनेक प्रकार घडत आहे. ई-पॉस मशिनलाच रेंज मिळत नसल्याने दुकानदारांना रेंजसाठी दुकानाच्या बाहेर रस्त्यावर यावे लागत आहे. राजगुरुनगरसारख्या शहरातच अशी परिस्थिती आहे. दुर्गम, डोंगरी गावांमधील अवस्था तर आणखी बिकट आहे. 

जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत याबाबत मुद्दा मांडला आहे. नवीन प्रणाली असल्याने काही अडचणी येत आहेत. प्रशिक्षित कर्मचारी दुकानांपर्यंत पाठवून समस्येचे निराकरण केले जात आहे. गरीब व गरजू स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री व समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी यंत्रणेतील दोष सुधारणेच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
- विजया शिंदे, सदस्य, जिल्हा दक्षता अन्न धान्य पुरवठा समिती

Web Title: e-poss machine problem ration