पक्षांतर केल्याने आठ जण निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्याने सहा नगरसेवकांसह दोन पदाधिकाऱ्यांना कॉंग्रेसमधून सोमवारी निलंबित करण्यात आले. त्यात माजी महापौर प्रसन्न जगताप आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस हरिदास चरवड यांचा समावेश आहे. 

पुणे - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्याने सहा नगरसेवकांसह दोन पदाधिकाऱ्यांना कॉंग्रेसमधून सोमवारी निलंबित करण्यात आले. त्यात माजी महापौर प्रसन्न जगताप आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस हरिदास चरवड यांचा समावेश आहे. 

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमधून इतर पक्षांत प्रवेश करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात 2012च्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक अभिजित कदम, सुनीता गलांडे, सुनंदा गडाळे, रईस सुंडके, शीतल सावंत आणि अश्‍विनी जाधव यांना कॉंग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले; तसेच चरवड आणि जगताप यांनाही तितक्‍याच कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव करण्यात आला. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी याबाबतचा ठराव मांडला; तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस सुधीर जानजोत आणि माजी सरचिटणीस रशीद खान यांनी अनुमोदन दिले, अशी माहिती पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी दिली. 

पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला. या वेळी आमदार शरद रणपिसे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, अजित आपटे, संगीता देवकर, नगरसेवक आबा बागूल, महिला कॉंग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष विकास लांडगे, "एनएसयूआय'चे अध्यक्ष भूषण रानभरे, सेवादलाचे रवींद्र म्हसकर, उमेश कंधारे, सुनील शिंदे, मुकेश धिवार, नदीम मुजावर आदी उपस्थित होते. 

पुणे

पुणे : 'गणेशोत्सव नक्की कोणी सुरू केला ?... तो 'ह्यांनी' सुरू केला की 'त्यांनी' सुरू केला, यापेक्षा तो सुरू झाला आणि तो...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

टाकळी हाजी (शिरूर, जि. पुणे): "ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे : पत्नी आई आणि वडीलांना सांभाळत नाही. घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते. याचा राग आल्यामुळे पत्नीचा तिच्या ओढणीने...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017