निवडणुकीतही ‘जोडी तुझी-माझी’

ज्ञानेश सावंत 
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - संसारात एकमेकांना साथ देणारे पती- पत्नी राजकारणाच्या आखाड्यातही ‘जोडी’नेच विरोधकांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज होत आहेत. महापालिका निवडणुकीत एकाच किंवा शेजारच्या प्रभागातून लढण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडे अनेक ‘श्री’ व ‘सौ’ इच्छुक आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर प्रशांत जगताप आणि त्यांच्या पत्नी अमृता, मनसेचे गटनेते किशोर शिंदे व त्यांच्या पत्नी माधवी, शिवसेनेचे नगरसेविका दीपाली ओसवाल अ आणि त्यांचे पती बाळा, भाजपकडून नगरसेविका मानसी देशपांडे आणि पती मनोज यांच्यासह अनेक जोडपी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली.

महापालिकेची नवी प्रभागरचना आणि त्यातील आरक्षण फायदेशीर असल्याचा दावा करीत, सर्वच राजकीय पक्षांमधील काही विद्यमानांसह आजी- माजी नगरसेवकांनी एकाच प्रभागातून पत्नीसह निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातच, नव्या प्रभागरचनेत विरोधकांचे आव्हान मोडीत चारही तगडे उमेदवार देण्याची या पक्षांची व्यूहरचना आहे. त्यामुळे ‘पती- पत्नी’ या जोडीचा पक्ष गांभीर्याने विचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये जोडी ‘तुझी- माझी’ हे चित्र पाहावयास मिळणार आहे.

आगामी निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत असून, त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. सर्व प्रभागांमध्ये तुल्यबळ उमेदवार उभे करण्याचा पक्षांचा प्रयत्न आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणीही करण्यात येत आहे. काही प्रभागांमधून पती- पत्नी दोघेही इच्छुक असल्याचे पक्षाच्या चाचपणीतून स्पष्ट झाले आहे. 

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्‍विनी आणि नितीन कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेविका उषा जगताप ही जोडी पुन्हा इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. नगरसेविका नंदा लोणकर आणि त्यांचे पती नारायण, नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत ही जोडी उमेदवारीची मागणी करीत आहेत. 
नगरसेविका भारती कदम त्यांचे पती प्रकाश, माजी नगरसेवक संतोष फरांदे, शैलेंद्र बडदे हे त्यांच्या पत्नीसह उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले व त्यांच्या पत्नी वंदना, नगरसेविका मनीषा चोरबेले व त्यांचे पती प्रवीण, धनंजय जाधव, शिवराम मेंगडे, भरत वैरागे, युवराज कुदळे, मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेंकर, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस हे त्यांच्या पत्नीसह इच्छुक आहेत.

नगरसेवक बावू आणि वनिता वागस्कर हे पुन्हा उमेदवारी मागत आहेत. काँग्रेसकडून महेश वाबळे व त्यांच्या पत्नी मनीषा, सोनाली व संजय मगर या जोडी इच्छूक आहेत.
लोक आग्रहास्तव पत्नीसह इच्छुक

महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘नव्या प्रभागातील चारही जागा जिंकण्याच्या दृष्टीने निवडणूक लढविणार आहे. लोकांचा आग्रह असल्याने पत्नीसह इच्छुक आहे. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करणार असून, दोघांची उमेदवारी निश्‍चित झाल्यास फायदा होईल.’’