पावसाच्या पहिल्याच दिवशी महावितरणच्या कामाचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) : पावसाळ्याच्या पहिल्या दिवशी महावितरणच्या कामाचा बोजवारा उडाला आहे, आंदर मावळाच्या पश्चिम भागातील पंधरा गावे आणि वाडया वस्त्यांनी अंधारात रात्र काढली. वातावरणातील उकाड्याने घामाच्या धारा वाहत होत्या, त्यामुळे पुरेशी झोप लागली नाही. निद्रादेवी आंदर मावळ वासीयांवर रुसून गेली. पहिल्याच दिवशी वीजेचा असा खेळखंडोबा झाला तर पावसाळयाचे चार महिने कसे जाणार असा प्रश्न पडला आहे. 

1 जूनला वातावरणातील असहाय्य उकाडय़ामुळे नागरिक त्रस्त होते, सायंकाळी चारच्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱ्यावर हलकसा पाऊस शिंपडला खरा,पण त्याने वातावरणात गारवा काही निर्माण झाला नाही.सोसाटयाच्या वा-यात वीज यंत्रणा मात्र कोलमडून पडली. वडेश्वर, नागाथली, शिंदेवाडी, घाटेवाडी, वाहनगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहूली, बेंदेवाडी, लालवाडी, चिरेखान, मोरमारेवाडी, रढेवस्ती, कुसूर, खांडी, निसाळवाडी, निळशीतील वीजपुरवठा खंडीत झाला. वातारणातील उकाडय़ामुळे आधीच नागरिक त्रस्त होते, त्यात वीज गायब त्यामुळे पंखेही बंद होते. मिणमिणात्या दिव्याच्या उजेडात नागरिकांना रात्र काढावी लागली.

पहिल्याच दिवशी ही परिस्थिती तर पुढे चार महिने काय अंधारातच काढायची की काय असा प्रश्न अनेक नागरिकांनी पुढे केला आहे. महावितरणने योग्य ती खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: electricity failure in takawe bdk its failure of mseb