डीजे नियम उल्लंघनप्रकरणी अकरा अटकेत

डीजे नियम उल्लंघनप्रकरणी अकरा अटकेत

पुणे - गणेशोत्सवातील सातव्या व नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजेच्या मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार हडपसर, मुंढवा, सिंहगड रस्ता या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. मुंढवा पोलिसांनी ११ जणांना अटक केली. 

मगरपट्टा परिसरातील अखिल बोरी भडक मित्र मंडळाचे अध्यक्ष चंदन कैलास तुपे, उपाध्यक्ष सुजित दिलीप माने, डीजेचा मालक साहील सय्यद मुन्नावर यांच्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी कारवाई केली. मांजरीतील राजहंस गणेश मित्र मंडळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. मगरपट्टा सिटीतील स्टार सिझन गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिकेत दिलीप मोरे, उपाध्यक्ष विक्रम गाटे, डीजेचे मालक दिगंबर नारायण उंदरे, चालक अतुल संभाजी अटोळे यांच्यावरही कारवाई केली.

सिंहगड पोलिसांनी आनंदनगरमधील दक्षिणमुखी मारुती सेवाग्राम ट्रस्ट, हिंगणे खुर्दमधील हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ व वडगाव बुद्रुक येथील शक्तिशाली मित्रमंडळ यांच्याविरुद्ध ध्वनिप्रदूषणाबाबत गुन्हा दाखल केला.

मुंढवा पोलिसांनी डीजे मालक-चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. युवराज लक्ष्मण कवडे (वय ४९), आकाश सागर पुजारी (वय २९), वैजनाथ जे. पिल्ले (वय ४४), सुनील बाबा परदेशी (वय ६३), चिराग राजेश आगवणे (वय १९), रवी हनुमंता दंडीले (वय ४१), विजय दिलीप इंगळे (वय ३८), रमेश दुर्गाप्पा हिरेकेरू (वय ३९), सागर प्रकाश गिरमकर (वय ३२), नीलेश विजय कांगाळे (वय ३२), विनोद विजय काळे (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com