बारामतीत 30 मे रोजी रोजगार मेळावा

Find_Jobs
Find_Jobs

बारामती शहर - पंचक्रोशीसह जिल्ह्यातील 1105 रिक्तपदे भरण्यासाठी बारामतीत बुधवारी (ता. 30) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे. 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या वतीने हा मेळावा होणार आहे. पुणे, बारामती, जेजुरी, कुरकंभ या औद्योगिक परिसरातील 29 उद्योजकांकडे 1105 जागा रिक्त असून, स्त्री व पुरुषांसाठी रोजगाराची ही सुवर्णसंधी आहे. आठवी, नववी पासून पुढे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण इच्छुकांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, एमसीव्हीसी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए अशा सर्वच पात्रताधारकांच्या इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे तसेच मुलाखतीसाठी येताना मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, अर्ज व आधारकार्डच्या प्रती सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com