अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

घोरपडीत १३ हजार चौरस फूट बांधकामे पाडली

मुंढवा - पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने घोरपडी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली असून, दिवसभरात तब्बल तेरा हजार आठशे पन्नास चौरस फूट बांधकाम पाडण्यात आल्याचे उपअभियंता बिपिन शिंदे यांनी सांगितले. 

घोरपडी परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. या भागातील सर्व्हे क्रमांक ४७ मध्ये पार्किंगसह चार मजल्यांचे ८००० चौरस फूट, सर्व्हे क्रमांक ४५ मध्ये पार्किंगसह एका मजल्याचे २४०० चौरस फूट, सर्व्हे क्रमांक ७१ मध्ये पार्किंगसह तीन मजल्यांचे ३००० चौरस फूट; तर सर्व्हे क्रमांक ६४ मध्ये पहिल्या मजल्यावरील ४५० चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. दिवसभरात महापालिकेकडून चार ठिकाणच्या बांधकामांवर कारवाई करून १३८५० चौरस फूट बांधकाम पाडण्यात आल्याचे उपअभियंता शिंदे यांनी सांगितले. 

बांधकाम विभागाचे उपअभियंता बिपिन शिंदे, अभियंता नरेंद्र देवकर, अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक डी. के. आडागळे व मुंढवा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Encroachment hammer