पर्यावरण संरक्षणाविषयी आता आशिया खंडासाठी अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभाग आणि भारतीय सर्पविज्ञान संस्थेतर्फे "पर्यावरण संरक्षणासाठी क्षमता विकास' या विषयावर चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. याचा उपयोग ड्युरेल वाइल्ड लाइफ ऍकॅडमी व ईआरटी कॉन्झर्वेशन या दोन संस्थांबरोबर एकत्रित काम करून आशिया विभागासाठी "पर्यावरण संरक्षण क्षमता विकास' या विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी केला जाणार आहे.

या परिषदेसाठी इंग्लंडमधील ईआरटी कॉन्झर्वेशन संस्थेचे डॉ. मार्क ओ'कोनेल, विद्यापीठातील पर्यावरण विभागप्रमुख प्रा. डॉ. नितीन करमाळकर, परिषद आयोजक समितीच्या सदस्या डॉ. अर्चना गोडबोले आदी उपस्थित होते.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषदेचे उद्‌घाटन केले. यामध्ये 12 देशांमधील 64 संस्थांचे 150 प्रतिनिधी सहभागी झाले होते. ईआरटी कॉन्झर्वेशन संस्थेमार्फत तांत्रिक साहाय्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच, डॉ. मार्क ओ'कोनेल यांनी या परिषदेची गरज व तरुणांना या विषयाबद्दल क्षमता विकासाबाबत मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या परिषदा यापूर्वी आफ्रिका आणि अमेरिकेतही झाल्या आहेत.

या परिषदेत जैवविविधता ओळखणे व अभ्यास, सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाचा जैवविविधतेसाठी उपयोग तसेच वन्य प्राण्यांचा बेकायदा व्यापार अशा विविध विषयांवर ऊहापोह झाला. प्राणिसंग्रहालयांचा पर्यावरण संरक्षणात उपयोग व नेतृत्वगुणांचा विकास या विषयांवरही चर्चा झाली.