कुंडमळ्यात वाहून जाणाऱ्या तरुणास वाचवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

काळेवाडी (पिंपरी) येथून सहा मित्र कुंडमळा (ता मावळ) येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यास आले असता एका जणाचा धबधब्याच्या पाण्यात पाय अचानक घसरला. पाण्यात पडलेल्या या तरुणाने कुंडातील खोल पाण्यात असलेल्या खडका चा आधार घेतला. नदीला चोहोबाजूंनी पाणीही अचानक वाढल्याने हा तरुण तेथे अडकला होता .

देहूरोड: कुंडमळा येथील धबधब्यात पाय घसरून पडलेल्या तरुणाला दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आल्याची घटना गुरुवारी (ता. 3) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

काळेवाडी (पिंपरी) येथून सहा मित्र कुंडमळा (ता मावळ) येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यास आले असता एका जणाचा धबधब्याच्या पाण्यात पाय अचानक घसरला. पाण्यात पडलेल्या या तरुणाने कुंडातील खोल पाण्यात असलेल्या खडका चा आधार घेतला. नदीला चोहोबाजूंनी पाणीही अचानक वाढल्याने हा तरुण तेथे अडकला होता .यावेळी स्थानिक तरुणांनी दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला.

सुजित सुनिलकुमार पिल्ले असे या तरुणाचे नाव आहे. सुजित व त्याचे अन्य मित्र कुंडमळ्यावर फिरण्यास आले होते. नदीच्या अलीकडून हे सर्वजण परीसरातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत नदीपात्रात पूर्व बाजूस असलेल्या कुंडदेवीच्या मंदिरासमोर गेले. बंधाऱ्यावरून पडणारे पाणी पाहण्याच्या नादात सुजितचा पाय घसरून तो पाण्यात कोसळला. पाणी जोरदार वाहते असल्याने तो वाहतच पुढे गेला मात्र मंदिराच्या मागील बाजूस खडक लागल्याने त्याचा आधार घेत तो खडकावर जाऊन बसला. यावेळी किशोर भेगडे,अमोल भेगडे,दत्ता भेगडे,सचिन भेगडे,बंटी भेगडे यांनी दोरीच्या साह्याने सुजितला पाण्याबाहेर काढले. जिवात जीव आलेल्या सुजितने कुंडदेवी मंदिरात नतमस्तक होत तरुणांचे आभार मानले.
 

Web Title: esakal news sakal news pimpri chinchwad news