"ईव्हीएम'मधील गैरवापराचे राष्ट्रवादी पुरावे गोळा करणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गैरवापराचे पुरावे गोळा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत रविवारी झाला. याबाबतचे पुरावे आणि तपशील दोन दिवसांत जमा करण्याचे आवाहन पक्षाच्या बैठकीत करण्यात आले. 

महापौर बंगल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची रविवारी सायंकाळी बैठक झाली. महापालिका निवडणूक लढविलेले पराभूत आणि विजयी उमेदवारांनीही त्यासाठी आमंत्रित केले होते. शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक उपस्थित होते. 

प्रत्यक्ष मतदानापेक्षा मोजणीत मतदान वाढले, मतदान केंद्रातील मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदान दाखविले गेले, काही भागांत उमेदवारांना दोन-तीनच मते मिळाली, भाजपच्या काही विशिष्ट उमेदवारांच्या बाबतीत मतदान फुगविले गेले आदी विविध तक्रारी या वेळी नगरसेवक-उमेदवारांनी केल्या. त्याचे पुरावे गोळा करण्याची सूचना या वेळी चव्हाण यांनी केली. 

बैठकीत वादंग 
पक्षाच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचीही तक्रार या वेळी शहराध्यक्षांकडे केली. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन चव्हाण यांनी दिले. त्यावरून महापौर जगताप आणि काही जणांमध्ये वाद झाल्यावर बैठकीचा समारोप झाला. महिलांची नावे घेतली जात नाहीत, अशीही तक्रार या वेळी झाली.