समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; अखेरचे दोन कॅम्प 

madhurangan
madhurangan

पुणे - मुलांच्या व्यक्तिमत्त्वात योग्य बदल घडावेत, नेहमीच्या संरक्षित वातावरणातून बाहेर पडून त्यांची निर्णयक्षमता विकसित व्हावी; तसेच निसर्गाच्या सहवासात जाऊन मनमोकळे जगता यावे, यासाठी संध्या नरेंद्र मुंदडा यांची "संस्कार संस्कृती' गेली 17 वर्षे समर कॅम्पचे आयोजन करीत आहे. यंदा "सकाळ- मधुरांगण'च्या सहकार्याने सभासद व "सकाळ'च्या वाचकांसाठी या कॅम्पचे आयोजन केले आहे. 

डेक्कनपासून 45 मिनिटांच्या अंतरावर पिरंगुट येथे घनदाट झाडीने वेढलेल्या 17 एकरांत संस्कार संस्कृती समर कॅम्प होतो. वेगवेगळ्या उपक्रमांसाठी अनुभवी शिक्षक येथे 24 तास उपस्थित असतात. नरेंद्र व सौमित्र मुंदडा हे या कॅम्पचे नियोजन करतात. ट्रेकिंग, टीम बिल्डिंग, आउटडोअर गेम्स, रॅपलिंग, कमांडो ब्रीज, नेट/रोप/रॉक/मंकी फ्लाइबिंग, लॅंडर पूल, टारझन स्विंग झोमॅरिंग, व्हॅली क्रॉसिंग, सेल्फ डिफेन्स, आर्चरी, रायफल शूटिंग, कॅम्प फायर, ट्रेझर हंट, योगासने, सूर्यनमस्कार, आर्ट अँड क्राफ्ट, डान्स, थिएटर ऍक्‍टिंग, जंगल ट्रीप, रेन डान्स, शेतीविषयक मार्गदर्शन, अशा विविध गोष्टींचा समावेश कॅम्पमध्ये असतो. 

विविध कालावधींच्या या कॅम्पमध्ये नृत्य दिग्दर्शक श्रीकांत बर्वे हे नृत्याचे धडे देणार आहेत. शंभराहून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांचे स्टंट डायरेक्‍टर अकबरभाई अभिनय शिकवणार आहेत. शास्त्रीय गायिका-संगीतकार समुपदेशक वर्षा भावे यांचेही मार्गदर्शन होईल. कॅम्पमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहे. 

निवासी शिबिराच्या तारखा 
1) दोन दिवसांचे ऍडव्हेंचर शिबिर - 14-15 मे 
2) तीन दिवसांचे ऍडव्हेंचर शिबिर - 14-16 मे 
3) सात दिवसांचे कल्चरल शिबिर - 13-19 मे 

येथे करा नोंदणी... 
- "सकाळ' मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, "सकाळ' मधुरांगण विभाग, दुसरा मजला 
(वेळ - सकाळी 11 ते सायं. 6) 
- श्री पार्वती निवास, 118/बी, दुसरा मजला, मुख्य प्रभात रस्ता 
(रविवारीही नोंदणी सुरू. वेळ - सकाळी 11 ते रात्री 8) 
- प्रवेशमूल्य रोख, धनादेश, ऑनलाइन ट्रान्स्फर, कार्डद्वारे भरून पूर्वनोंदणी आवश्‍यक. 
- नावनोंदणीसाठी संपर्क - 8378994076 

अर्णवने खूप एन्जॉय केला. पहिल्यांदाच आम्ही त्याला कॅम्पला पाठवले. शिक्षक सतत बरोबर असायचे. त्यांनी मुलांचा सुरक्षित सांभाळ केला. मुलांनी पहिल्यांदाच गीर गाय बघितली व पहिल्या धारेचे दूधही पिले. खूप मजा आली. आम्ही नक्की परत पाठवू. 
- अर्णवची आई 

श्रावणी आणि तिच्या बहिणीला कॅम्प खूप आवडला. घरी येऊन कॅम्पचे अतिशय कौतुक केले. सर्व ऍक्‍टिव्हिटी मजेदार होत्या. विशेषत- कॅम्पफायर, आर्चरी, जेवण व स्नॅक्‍स प्रचंड आवडले. प्रशिक्षक सगळी काळजी घेत होते. 
- श्रावणीची आई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com