वालचंदनगरमध्ये नेत्रतपासणी, चष्मे मोबाईलचे वाटप

राजकुमार थाेरात
मंगळवार, 17 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदपूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवनाथ धांडोरे मित्र मंडळातर्फे माेफत नेत्र तपासणी शिबीर, चष्मे वाटप, गरजू महिलांना साडी वाटप व निराधार महिलांना मोफत मोबाईल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, आर.पी.आय.चे एम.बी.मिसाळ, मनसेचे इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष भिसे, राष्ट्रवादी वालचंनगरचे शहराध्यक्ष तुषार घाडगे, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष मधुकर डोंबाळे, लता उबाळे उपस्थित होते.  

यावेळी प्रताराव पाटील यांनी सांगितले की, युवकांनी समाजातील सर्व नागरिकांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी १६० नागरिकांना चष्मे, ७५ महिलांना साड्या व  १० महिलांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष नवनाथ धांडोरे,  बबलू सोनवणे, संतोष क्षीरसागर, गणेश धांडोरे, लक्ष्मण चांदणे, पिंटू उबाळे, निशांत चव्हाण, दादासाहेब बाबर, बारिक यादव, संतोष लोंढे, रोहीत सोनवणे, रवी लोंढे, चेतन सावंत, प्रशांत पवार या युवकांनी परिश्रम केले.

Web Title: eye checking and distribution of spectacles free in valchandnagar