शिरूर नगर परिषदेवर भाजपची सत्ता- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

शिरूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाला जगभरातून पसंती मिळाली असून, सामान्य जनतेनेही त्यांच्या विचारांवर विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शिरूर नगर परिषदेची सत्ताही भारतीय जनता पक्षाच्या हाती येणार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहर विकासाच्या दृष्टीने आमदार बाबूराव पाचर्णे व नगराध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या वत्सलाताई पाचंगे हे जी कामे सूचवतील ती तातडीने मार्गी लावली जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा चौकात झालेल्या सभेच्या वेळी वत्सलाताई पाचंगे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्‍नांविषयीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. तसेच याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
या वेळी फडणवीस यांनी पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे संपूर्ण पॅनेल विजयी करा. भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणा. त्यानंतर जी कामे तुम्ही सूचवाल ती तातडीने मार्गी लावली जातील, असे आश्‍वासन दिले.

फडणवीस म्हणाले, ""नगर परिषद असलेल्या शहरांना "स्मार्ट सिटी' करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावली जातील. आमची बांधिलकी धनदांडग्यांशी नव्हे, तर सामान्यांशी आहे. या घटकांसाठी राज्य सरकारची तिजोरी कायम खुली राहील. कुठल्याही कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.''
शुद्ध पाणी, नद्यांची स्वच्छता, प्रदूषणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठीच्या अनेक योजना राज्य सरकारकडे तयार आहेत. शिरूरसाठीही अनेक योजना विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपसारख्या सर्वांत मोठ्या पक्षाने टाकलेला विश्‍वास रचनात्मक विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवू, असे पाचंगे यांनी सांगितले.
शहर विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहिती पाचर्णे यांनी दिली. गाव एक व्हावे, यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याची भूमिका घेतली होती; परंतु काही बाहेरच्या लोकांच्या सल्ल्यावरून विकास आघाडीने विश्‍वास आणि संयमाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप त्यांनी केला.