बनावट दाखवून खरे दागिने चोरणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - सोन्याचे बनावट दागिने दाखवून खरे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज येथून बुधवारी अटक केली. सुरेश दयाभाई परमार (वय 34, रा. करंजावडे सेक्‍टर, पनवेल, जि. रायगड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, सोन्याच्या 30 बनावट अंगठ्या आणि इतरही दागिने जप्त केले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या बनावट अंगठ्या विकण्यासाठी दोघे जण कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कात्रज उड्डाण पुलाखाली थांबल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी परमार याला ताब्यात घेतले. जिक्‍या काळे (रा. सांगली) हा त्याचा साथीदार या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. या वेळी परमार याच्याकडे सोन्याच्या नऊ बनावट अंगठ्या आणि मण्यांची एक माळ आढळून आली. 

साथीदाराच्या मदतीने परमार याने कात्रज परिसरात फसवणूक आणि चोरीचे एकूण पाच गुन्हे केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी तेथून आणखी सोन्याच्या बनावट 21 अंगठ्या आणि चार पाटल्या जप्त केल्या. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. 10) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, श्रीधर पाटील, समीर बागसिराज आणि बाबासाहेब नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: fake jewelry thieves arrested