पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला; महिलेविरुध्द गुन्हा दाखल

पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) यांच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
crime
crimeSakal
Summary

पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) यांच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बारामती - पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) यांच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सन 2017 मध्ये झालेल्या पोलिस पाटील भरतीवेळेसचे हे प्रकरण आहे. त्या वेळेस जन्मतारखेचा चुकीचा व खोटा दाखला दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. मंडल अधिकारी महंमद पापा सय्यद (रा. फलटण रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली.

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या प्राधिकृत पत्रानुसार सय्यद यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. विद्या कोळेकर यांनी सन 2017 मध्ये पोलिस पाटील परीक्षेच्या वेळी जन्माचा बनावट दाखला सादर केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.

त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिका-यांनी बारामतीच्या तहसीलदारांना व तहसीलदारांकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्यांचा चौकशी अहवाल तहसीलदारांना सादर केला.

विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर यांनी सादर केलेला जन्माचा दाखला विवाहापूर्वीच्या विद्या सतीश करे या नावाने सादर केला होता. तो चोपडज ग्रामपंचायतीकडील असून त्यावर 1991 हे जन्माचे वय नमूद होते, प्रत्यक्षात त्यांचा जन्म 1993 मध्ये गणेशवाडी (ता. कर्जत, जि. नगर) येथे झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिस पाटील पदासाठी वयाची अट पूर्ण कऱण्यासाठी त्यांनी चोपडज ग्रामपंचायतीकडील खोटा दाखला सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com