#FamilyWalkathon ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

आपल्या जन्मापासून ते आपला संसार फुलविण्यापर्यंत आई राबत असते. मुलांवरील प्रेमापोटी ती कष्ट झेलत जाते आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत जाते. मातृत्वाची ही सावली आपल्याबरोबर कायम राहावी, या हेतूने "फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम राबविण्यात आला. ​

पुणे : अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक 'मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर आज (रविवारी) सकाळी आयोजित केलेल्या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' #FamilyWalkathon या उपक्रमात शेकडो नागरिक उत्साहात सहभागी झाले.

आज सकाळी साडे सहा वाजता एकत्र येऊन चालण्याचा उपक्रम 'सकाळ'ने आयोजित केला होता. कला, साहित्य, राजकारण, उद्योग, प्रशासन, आदी विविध क्षेत्रातील सेलीब्रेटी, मान्यवरही त्यात कुटुंबासह सहभागी झाले होते. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तर, अभिनेत्री सुवर्णा काळे, रिना लिमण व मॉडेल अनुजा शिंदे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधला.

आपल्या जन्मापासून ते आपला संसार फुलविण्यापर्यंत आई राबत असते. मुलांवरील प्रेमापोटी ती कष्ट झेलत जाते आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत जाते. मातृत्वाची ही सावली आपल्याबरोबर कायम राहावी, या हेतूने "फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम राबविण्यात आला. आई, पत्नी, मुलांसह या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ'च्या "मॉर्निंग वॉक' उपक्रमात नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: #FamilyWalkathon With Sakal Morning Walk Program On The Taljai Hill On The Occasion Of Mothers Day