शेतकरी- तज्ज्ञांमध्ये घडणार थेट संवाद 

शेतकरी- तज्ज्ञांमध्ये घडणार थेट संवाद 

पुणे - किफायतशीर, फायदेशीर स्मार्ट शेतीसाठी आवश्‍यक कौशल्यांसंबंधी शेतकरी- तज्ज्ञांमध्ये थेट संवाद घडविणारा दोन दिवसीय तिसरा "कृषी ज्ञानसोहळा' रविवारी (ता. 8) सुरू होत आहे. सकाळनगर येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजीराव निलंगेकर- पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 

अहिरराव इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. हे कार्यक्रमाचे लीड पार्टनर, "गरवारे वॉलरोपस्‌', "केएफ बायोप्लांटस्‌',"न्यू- हॉलंड ऍग्रिकल्चर' हे असोसिएट पार्टनर आणि "मॅशिओ गास्पार्डो', "सन अँड ओशन', "कृभको' हे ट्रॅक पार्टनर आहेत. "एसआयएलसी'मध्ये आजवर प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षितांबरोबरच इतरांनाही या ज्ञानपर्वणीत सहभागी होता येणार आहे. 

यापूर्वी झालेल्या कृषी ज्ञान सोहळ्यांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यंदा या सोहळ्यात प्रक्रिया उद्योजक मनीषा धात्रक, पोल्ट्री उद्योजक दादा गांगुर्डे, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे, मत्स्यउद्योजक हसन मसलाई, शेळीपालनातील उद्योजक पृथ्वीराज चव्हाण, मधमाशीपालनातील उद्योजक दिनकर पाटील, शेतमाल सप्लाय चेनमधील तज्ज्ञ प्रेरणा देसाई, कमोडिटी मार्केटविषयी "एनसीडीईएक्‍स'चे अधिकारी, ओंकारसिंग बात्रा, सुरेश भोसले आदी मार्गदर्शन करणार आहेत. कृषी क्षेत्रातील नामांकित इंडस्ट्रीजचा यात सहभाग असणार आहे. 

सहभागासाठी 
- नावनोंदणीसाठी संपर्क ः 8605699007 
- पार्टनरशिप आणि प्रायोजकतेसाठी संपर्क ः 9270069707, 9021602414 
- "एसआयएलसी'च्या प्रशिक्षितांसाठी मोफत प्रवेश 
- नवीन प्रशिक्षणार्थींसाठी ः दोन दिवसांसाठी प्रति व्यक्ती सहाशे रुपये (चहा, जेवण, प्रमाणपत्रासह) 
- कार्यक्रमाचे ठिकाण ः एसआयएलसी कॅम्पस, बाणेर रोड, गेट नं. 1, सकाळनगर, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com