शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका: चंदू चव्हाण

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : सैन्यदलातील आपले अनुभव सांगताना चंदू चव्हाण. यावेळी व्यासपीठावर सूर्यकांत पलांडे, "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार (उजवीकडून).
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : सैन्यदलातील आपले अनुभव सांगताना चंदू चव्हाण. यावेळी व्यासपीठावर सूर्यकांत पलांडे, "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार (उजवीकडून).

तळेगाव ढमढेरे (पुणे): "लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. देशासाठी काही करावे ही तीव्र इच्छा मनात असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालो. भारत-पाक चकमकीत पाकच्या तावडीत सापडलो. अनेक यातना सहन केल्या. तीन महिने व 21 दिवस माझ्यासमोर मृत्यू दिसत होता. पण, मी हरलो नाही. शेतकऱ्यांनीही संघर्ष करावा, पण कोणत्याही स्थितीत आत्महत्या करू नये,'' असे आवाहन पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाण यांनी केले. आपला संघर्ष उलगडताना ते भावनाविवश झाले.
 
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे www.shirurtaluka.comच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सूर्यकांत पलांडे होते. कलासागर प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संगणक अभियंता हिमांशूराजे पवार, दीपाली शेळके, डॉ. अंकुश लवांडे आदी उपस्थित होते.

चंदू चव्हाण म्हणाले, ""माझ्यासारखे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. पाकिस्तानच्या जेलमध्ये प्रत्येक क्षणाला मृत्यू दिसत होता. दरम्यान, गावाकडे आजीचे निधन झाले. आजीसाठी रडू की, पकडलेल्या भावासाठी रडू, अशी परिस्थिती माझ्या भावाची झाली. अखेर तो दिवस उजाडला आणि पुनर्जन्म घेऊन मी भारतात परतलो. येथून पुढे देशासाठी जगत राहणार आहे. यातना सहन कराव्या लागल्या, परंतु देशाबद्दलची निष्ठा ढळू दिली नाही. आयुष्यात संघर्ष झाला, तरी डगमगू नका.''

यावेळी चंदू चव्हाण व सूर्यकांत पलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश केदारी यांनी स्वागत केले. ई सकाळचे वरिष्ठ उपसंपादक संतोष धायबर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com