संस्थेचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा

संस्थेचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा

औंध -  ‘‘शेतकरी उत्पादक संस्थेसारख्या शेतकऱ्यांसाठी पूरक संस्थेला प्रोत्साहन व मदतीसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी तयार आहे. परंतु या शेतकरी उत्पादक संस्थेत केवळ खरे शेतकरीच हवेत व त्यांनाच या योजनेचा फायदा मिळावा. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल,’’ असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी गुरुवारी (ता. २०) येथे व्यक्त केले. 

वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या वतीने ‘अद्ययावत, स्पर्धात्मक व मजबूत शेतकरी उत्पादक संस्था’ या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी रूपाला बोलत होते. या वेळी निती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद, अहमदाबादच्या आयआयएमचे प्राध्यापक डॉ. सुखपाल सिंह, संस्थेचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी, डॉ. सुधीरकुमार गोयल,  राज्याचे कृषी आयुक्त एस. पी. सिंग आदी उपस्थित होते.

रूपाला म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य तो दर मिळायलाच हवा. तो मिळवण्यासाठी शेतीमालाचा दर्जेदार पुरवठा झाला तर नक्कीच दरही मिळेल, परंतु यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.’’ जागतिक पातळीवरील कृषी मालाच्या विक्रीतील संभाव्य धोके, समस्या व संधी याचाही शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

या वेळी डॉ. सुधीर गोयल, प्रा. रमेश चंद, डॉ. के. के. त्रिपाठी, डॉ. सुखपाल सिंह यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com