पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर कारखान्याला पाचव्यांदा पुरस्कार 

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर कारखान्याला पाचव्यांदा पुरस्कार 

पारगाव : दत्तात्रयनगर (पारगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा  नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., (नवी दिल्ली) यांचा वतीने देण्यात येणारा वसंतदादा पाटील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” पाच वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर ठरला असुन कारखान्याने आत्तापर्यंत देश व राज्य पातळीवरील एकुण 22 पुरस्कार प्राप्त केले असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

गाळप हंगाम 2019- 20 मध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., (नवी दिल्ली) यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची घोषणा गुरुवार (ता. 28) रोजी करण्यात आली यामध्ये देशातील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कारा ” साठी भीमाशंकर कारखान्याची पाचव्यांदा निवड झाली आहे.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रीया देताना कारखान्याचे अध्यक्ष बेंडे म्हणाले, ''कामगार व उत्पादन शुल्क मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेले ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.''  

मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १० व राज्य पातळीवरील १२ असे एकूण २२ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार पाच वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे. असेही बेंडे यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com