चित्रपट अभिनेत्याला तरुणांकडून मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - रेगे फेम अभिनेता आरोह नितीन वेलणकर (वय 27, रा. कोथरूड) याला दोन तरुणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना कर्वे रस्त्यावरील कलिंगा हॉटेलजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. 

याप्रकरणी आरोह याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रवीण ज्ञानेश्‍वर मोहोळ (वय 29, रा. आझादनगर, कोथरूड) आणि संग्राम सुदाम तांगडे (वय 21, रा. कर्वे रस्ता एरंडवणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

आरोह हा त्याची मोटार हॉटेल कलिंगासमोर रस्त्यालगत पार्क करून थांबला होता. त्या वेळी मागून मोटारीतून आलेल्या आरोपींनी जोरजोरात हॉर्न वाजवला. त्यानंतर शिवीगाळ करून आरोह याला मारहाण केली. तसेच त्याच्या मोटारीचे नुकसान केले. 

काहीही चूक नसताना असा अनुभव येणे अपेक्षित नव्हते. आरोपींनी दारूच्या नशेत कर्वे रस्त्यावर हा तमाशा केला. मात्र, कोणीही मदतीला आले नाही, हे 
दुर्दैवी आहे. आरोपींनी इतर नागरिकांनाही मारहाण केली. पोलिसांसमोर त्यांनी शिवीगाळ केली. मी काहीही करू शकतो, असा त्यांचा ऍटिट्यूड होता, हे काय चाललंय? 
- आरोह वेलणकर, अभिनेता.