हडपसरमध्ये लाखो रूपयांचा पुठ्ठा जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

हडपसर (पुणे)- स्वामी विवेकानंद औद्योगिक वसहाततीतील श्री पॅकेजींग
कंपनीला आज (गुरुवार) आग लागून कंपनीतील लाखो रूपयांचा पुठ्ठा जळून खाक झाला. पाच आग्निशामक बंबच्या गाडयाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण रात्री उशीरापर्यंत समजू शकले नाही.

महापालिकेच्या अग्निशामक मुख्य केंद्राचे विभागीय अधिकारी रमेश दांगट
यांनी दिलेल्या माहिती नुसार, हांडेवाडी रस्त्यावर काळे पडळ भागात स्वामी
 विवेकानंद औद्योगिक वसाहतीत ही कंपनी आहे. कंपनीला गुरुवार असल्याने सुटी
 होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कंपनीतून अचानक धूर येत असल्याची
माहिती नागरिकांनी दिली. याच कंपनीच्या आवारातील पत्र्याच्या शेड मध्ये
 कामगार राहत होते. त्यांनी प्रसंग अवघान राखून कंपनीचे शटर उघडले. यावेळी
 पुठ्ठ्याच्या आग लागल्याचे निदर्शनास आले. तात्काळ घटना स्थळी अग्निशमन
दलाचे बंब पोहचले. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे कात्रज
व मुख्य अग्निशामक विभागाच्या पाच अशा एकूण सहा बंबच्या सहाय्याने आग
 आटोक्यात आणली. या घटनेत कंपनीतील मशीन व पुठ्ठयाचे रोल जळून खाक
 झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.

Web Title: fire in hadapsar
टॅग्स